शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०११

काही चारोळ्या....


२ G आणि काही लाखो करोडो रुपये...
 
सर्व "निधी" मोजून झाल्यावर 
त्यांना जनतेची "करुणा" आली 
आपल्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी 
शेवटी "राजांना" अटक झाली
 
काळ सोन - "तेल तेल आणि तेल..."
 
शेषशायी विष्णूला जागवण्यासाठी
शंकरापाठी भस्मासुर लागला
गृहखात्याला जाग येण्यासाठी
मनमाडमध्ये सोनावणे जळला
 
वाटमारीच्या वाटणीवरून वाद आहे
तडजोडीसाठी माफिया तुरुंगात आहे
"मारी" ची रक्कम ठरल्यानंतर
जामिनाची "वाट" मोकळी आहे
 
 
(सैफुद्दीन डागर - धृपद गायक गेली पंचवीस वर्षे मंजूर झालेले (कागदावर) घर मिळवण्यासाठी झगडत आहेत)
 
सुरांनी मनात बांधतात घर
त्यांना मिळतो सरकारी कागद
ज्यांच्या कागदात असतो दम
त्यांना मिळते "आदर्श" घर