शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०१५

सोप्प


सोप्प बोलायचं, ठरलंच आहे 

अवघड शब्दांचे, अवघड प्रश्न 
घालायचेच नाही, ठरलंच आहे 
मागे वळून, लांब जाताना 
बघायचच नाही, ठरलच आहे 

आता पिंजऱ्यातच कोंडून घ्यायच,
नाही कधी कुढायचं, ठरलंच आहे 
कातरवेळी, उदास संध्याकाळी
हसतच राहायचं, ठरलच आहे 

भातुकलीचा पसारा आवरून
चट्टामट्टा करायचा, ठरलंच आहे 
खेळ कधी मांडलाच नव्हता
असच घोकायच, ठरलंच आहे 


सोप्प जगायच, गुंतू जायच 
अळूचे पान व्हायचठरलंच आहे 
मला देणे नाही, मला घेणे नाही 
सन्यस्त व्हायच, ठरलंच आहे 

आशावादी अपेक्षांचे, काटेरी किनारे 
अलगद टाळायच, ठरलच आहे 
वादळ पाहून, गलबत लोटायच
शीडासकट फाटायच, ठरलच आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा